Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू करंडक टी-२० क्रिकेट; आरोग्य विज्ञान, सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर मराठवाडा व शिवाजी विद्यापीठ उपांत्य फेरीत

तरुण भारतbyतरुण भारत
February 8, 2026
in sports
0
0
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, सावित्रीबाई फुले पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू करंडक टी-20  क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित महाराष्ट्र राज्यातील विविध विद्यापीठ शिक्षक व कर्मचारीवृंद यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा सोलापुरात होत असून पाचव्या दिवशी साखळी फेरीचे शेवटचे ६ सामने पार पडले.  सकाळच्या सत्रात नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, बाटु लोणेरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने विजय मिळविले. दुपारच्या सत्रात पुणे येथील सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठांनी प्रतिस्पर्धी संघावर मात केली.

पाचव्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे रोहित गमरे (बाटु लोणेरे) याने लगावलेले नाबाद शतक. 53 चेंडूत 9 चौकार, 5 षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. तसेच  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या स्पर्धेतील आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 245 करत तब्बल 150 धावांनी सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. जितेंद्र पाटील, निखिल शिंदे, जयराम हंबर्डे, जय देशमाने, रवी पारधी या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत अर्धशतके झळकावली आणि पुणे विद्यापीठाच्या मनीष गायकवाड याने सलग तिसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार पटकाविला. रविवारी दोन्ही उपांत्य सामने होणार असून सोमवारी तिसऱ्या स्थानाचा व अंतिम सामना होणार आहे.

पाचव्या दिवशी इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर जितेंद्र पाटील, सुनील थोरात यांना तर रेल्वे मैदानावर क्रीडा शिक्षक नागटिळक यांच्या हस्ते विनायक शिंदे (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) व डॉ.मलिक रोकडे यांच्या हस्ते महेंद्र बनकर यांना सामनावीराचे पुरस्कार देण्यात आले. तसेच दयानंद कॉलेज मैदानावर शतकवीर रोहित गमरे, मनीष गायकवाड यांना आणि भंडारी मैदानावर संदीप चौधरी, खताळ बामू यांना देखील सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले. 

संक्षिप्त धावफलक :

1) इंदिरा गांधी पार्क स्टेडियम

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक : 144/6 (20) निखिल शिंदे नाबाद 71, रामदास गुंबडे व अभिषेक देशमुख 12, संदीप भागवत व योगेश जाधव 10, जितेंद्र पाटील, रश्मिकांत जाधव,  किशोर पवार, चंदन मोरे व अरुण सपकाळे प्रत्येकी 1 बळी. पराभूत विरुद्ध बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव : 148/4 (14.2) जितेंद्र पाटील नाबाद 59, स्नेहल कुवर नाबाद 29, अरविंद गिरनारे 20, किशोर पवार 17, निखिल शिंदे 41/2, मिलिंद ठाकरे 1 बळी.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली : सर्व बाद 131 (18.2) अनिल चव्हाण 30, अविनाश के. 20, प्रवीण पहानाते सचिन मून 15, अवांतर धावा 17  मुक्तार शेख सुनील थोरात ज्ञानेश्वर भोई प्रत्येकी 2 बळी, मुकुंद माळी हनुमंत लोखंडे प्रत्येकी 1 बळी. विजयी विरुद्ध 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ : 133/3 (16.2) उमराव मिटकरी नाबाद 43, सुनील थोरात 31, हनुमंत लोखंडे 24, अवांतर धावा 17, सतीश एस.,अनिल चव्हाण, प्रवीण पहाणते प्रत्येकी 1 बळी.

2) रेल्वे मैदान

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुर : 120/4 (20) अतुल ढोक 33, संदीप रिंधे 22, राजेश लिमसे व प्रकाश घुले 20,शशिकांत दाभाडे 27/2, योगेश दळवी, राजेश्वर मुपडे प्रत्येकी 1 बळी. पराभूत विरुद्ध शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर : 121/3 (15.3)

विनायक शिंदे 40, विक्रम कोंढावळे नाबाद 28, विशाल हिळगे नाबाद 23, अजित माळी, नितीन डोंगरे, विठ्ठल धायगुडे प्रत्येकी 1 बळी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर : 135/8 (20) निनाद राऊत 24 दुर्गेश बैस 23 रितेश पुर्काम ईश्वर कुटे 19, सुरज सूर्यवंशी 17 रमेश शेवरे 11, सतपाल गायकवाड 23/4, गौरव दानवे 24/2, सचिन भिंगारदे, भगवान राठोड प्रत्येकी 1 बळी. विजयी विरुद्ध 

कृषी विद्यापीठ राहुरी : सर्वबाद 82 (11.3)

सतपाल गायकवाड 25 सचिन सोनवणे 19 मोहसीन शेख 12, महेंद्र बनकर 15/4, रमेश शेवरे 14/3, निनाद राऊत 1 बळी.

3) दयानंद कॉलेज मैदान

स्वामी रामतीर्थ विद्यापीठ नांदेड : 142/6 (20) जयराम हंबर्डे 63, नारशि कागदा 27, रशीद शेख 15, अवांतर धावा 12

आदेश सोनार व अल्पेश कोरपे प्रत्येकी 2 बळी  पराभूत विरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे : 146/3 (17.4) रोहित गमरे नाबाद 102, दिशांत शिंदे 22, मेहुल कोरपे 12, शैलेश कांबळे 20/2, रशीद शेख 1 बळी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी  : सर्व बाद 83 (16.3) पराभूत विरुद्ध  सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे : 86/2 (11.4) मनीष गायकवाड नाबाद 48, दीपक गजरमल 17, नितीन प्रसाद 10,

मारोती शेल्लाळे माणिक ढगे प्रत्येकी 1 बळी.

4) भंडारी स्पोर्ट्स क्लब मैदान

कविकुलगुरु-कालिदास-संस्कृत-विश्वविद्यालय रामटेक : 56/9 (13) जावेद तुरक 18, अवांतर धावा 12, संदीप चौधरी 17/3, पुष्कर तऱ्हाळ 6/3, योगेश राऊत 13/2 बळी.

पराभूत विरुद्ध  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक : 57/1 (5.4) नंदकिशोर ठाकरे 26, नंदकिशोर वाघ 12, निलेश राठोड 1 बळी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठ : 245/4 (20) जय देशमाने 72, रवी पारधी 67, जितेंद्र पाटील 21, खताळ 30, मोहित शेख नाबाद 34, किरण नांदणे 40/2, अनिल मेश्राम 1 बळी. विजयी विरुद्ध 

संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती : 95/9 (20)किरण नांदणे 25, अविनाश असणारे 16, अवांतर 18 धावा, सचिन भरडे 12

खताळ बामू 14/4, रणजीत तांगडे 17/3 बळी

Post Views: 190
Previous Post

कुंभारी येथे २२ बूथ व २२ हजार मतदारांसाठी पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त; मतदान शांततेत पार

Next Post

पंढरपूर तालुक्यात ८ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी मतदान शांततेत पार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पंढरपूर तालुक्यात ८ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १६ गणांसाठी मतदान शांततेत पार

ताज्या बातम्या

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1245768

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!