सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात माढ्यातील जनहित शेतकरी संघटनेचे नेते अतुल खूपसे पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी आपल्या रक्ताने त्यांनी संजय माळी यांच्या पोस्टरवर रक्त अभिषेक करून निषेध नोंदवला तसेच आपले कार्यकर्ते बापूराव मोहिते यांना अर्धनग्न करून प्रति संजय माळी म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासले तसेच त्यांच्या गळ्यात नोटांचा हार घालून निषेध नोंदवला. परंतु ही स्टंटबाजी खूपसे पाटील यांच्या अंगणात आली तात्काळ पोलिसांनी या ठिकाणी येऊन त्यांना ताब्यात घेतले तसेच बापूराव मोहिते या कार्यकर्त्यालाही अर्ध नग्न अवस्थेत पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर बजार पोलीस ठाण्याकडे रवाना केले.
जिल्हा परिषदेसमोर महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेला बोलावण्यात आले होते,यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यांनाही हाकलून लावले.