ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटक जंगल सफारीचा आनंद लुटत असताना तारू आणि शंभू नावाचे दोन वाघ पर्यटकांसमोर आले. समोर आणि मागे पर्यटकांची जिप्सी होती. मध्यभागी दोन्ही वाघ… समोर वाघ पाहून पर्यटकांनी आनंद व्यक्त करत त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. दोन वाघ अगदी जवळून दिसल्याचा पर्यटकांना आनंद झाला.
अचानक दोघांमध्ये भांडण सुरू झालं
मात्र अचानक त्या दोन वाघांमध्ये जोरदार भांडण सुरू झालं. जिप्सीसमोर दोन वाघ आपापसात भांडत असल्याचं पाहून पर्यटक थक्क झाले. त्या दोघांमध्ये ही झुंज जवळपास अर्धा तास चालली.
अर्धा तास सुरू होतं भांडण
दोन वाघांचं भांडण सुरू असताना दोघंही जिप्सींच्या अगदी जवळ येत होते. वाघ अधूनमधून एकमेकांवर हल्ला करत होते. हे फार दुर्मिळ दृष्य होतं. या झुंजीत दोन्ही वाघ जखमी झाले होते. हे दुर्मिळ दृश्यं मुंबईचे वन्यजीव छायाचित्रकार नितीन उळे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत.
तारू आणि शंभू …दोघांना एकमेकांवर हल्ला
जिप्सी पर्यटकांना घेऊन जात असताना अचानक तारू आणि शंभू हे दोन वाघ समोर आले. अचानक दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झालं. ही झुंज थरारक होती.
डरकाळी फोडत वाघ एकमेकांवर अधूनमधून हल्ला करत होते. पर्यटक आपला जीव धोक्यात घालून होते. मात्र, पर्यटकांसोबत उपस्थित सर्व जिप्सी चालक आणि मार्गदर्शक अनुभवी होते, त्यामुळे त्यांनी पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं.
दोघंही भांडून थकले आणि…
तारू आणि शंभू दोघेही एकमेकांना नखांनी ओरबडत होते. दोघांच्याही अंगातून रक्त वाहत होतं. काही वेळ भांडून दोघेही थकले. दोघांनी पाणी प्यायले आणि मग दोघेही मागे-पुढे निघून गेले.