सोयगाव / संभाजीनगर – मालेगाव तालुक्यातील डोंगरळे येथील चिमुकली मुलीवर झालेल्याअत्याचार व हत्येप्रकरणी तात्काळ कारवाई करून हा खटला अति जलद गतीने चालवावा या मागणीचे निवेदन गुरुवारी सोयगाव तालुका सुवर्णकार समाज मंडळाच्या वतीने सोयगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना दिले
डोंगराळे ता.मालेगाव येथिल कु.यज्ञा जगदीश दुसाने,निष्पाप चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करुन तीच्या डोक्यात दगड घालुन निघृण हत्या करण्यात आली ही घटणा संपूर्ण सुवर्णकार संमाजासह संपुर्ण मानव जातीच्या अंतःकरणाला असद्य वेदना देणारी असुन काळीमा फासणारी आहे.अशा प्रकारचे दुष्कृत्य करणारे नराधम समाजात राहाण्यास पात्र नाहीत,न्याय मिळेपर्यंत समाज शांत बसणार नाही या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सोयगाव पोलीस ठाण्याचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्षवेधी निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनातअत्याचार व हत्याकांड करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी,ही घटना फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवून न्याय प्रक्रिया विलंब न करता त्वरीत निकाल देण्यात यावा.दुसाने परीवारास शासनामार्फत योग्य संरक्षण,आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करुन देण्यात यावी.
या मागण्या निवेदनात नमूद आहे निवेदनावर सुवर्णकार समाज अध्यक्ष विष्णू शेठ दुसाने,उपाध्यक्ष राजू भामरे,दिनकर पिंगाळकर,महेंद्र पिंगाळकर,गोपाल दुसाने, पप्पू दुसाने,युवराज विभांडिक,गजानन अंबिलवादे,महेश दुसाने,अशोक पिंगाळकर,योगेश इखनकर,मनोज देसाई, दिपक भामरे,अरुणभामरे,दत्ता दुसाने,सोमनाथ सोनार, आदि समाज बांधवाच्या स्वाक्षरी आहे.
सोबत फोटो –























