लातूर / उदगीर – व्हिएतनाम मधील हो ची मिन्ह सिटी (एच सी एम सी) नुकत्याच पार पडलेल्या अंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेत उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालय च्या द्रव्यगुण विभागाच्या प्राध्यापिका डॉ .सौ.शितल जाधव-घोरबांड यांनी आक्रमक वनस्पतींची वेगाने होणारी वाढ – आयुर्वेदाच्या अस्तित्वासाठी धोक्याची घंटा या शोध प्रबंध चे वाचन केले आहे.
या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रो.डा.तनुजा नेसरी, निर्देशक आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था, जामनगर, गुजरात भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग, भारत सरकार,नवी दिल्ली चे सदस्य डॉ नारायण जाधव तसेच भारतीय दुतावासातील अधिकारी, महेशचंद गिरी प्रा डॉ.गितांजली कार्ले विभाग प्रमुख, आयुष, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तथा आयोजक डॉ.शिल्पा स्वार व अन्य निमंत्रित विविध देशांतील विशेषज्ञ उपस्थित होते .
या शोध निबंधाचा महत्वाचा सार हा पुढीलप्रमाणे होता.आयुर्वेद हे जगातील सर्वात प्राचीन चिकित्सा पद्धती पैकी एक आहे. ह्या उपचारपद्धतीचा आधार वैविध्यपूर्ण जैवसंपत्ती आहे. विशेषतः वनस्पती हा चिकित्सेचा आत्मा आहे. परंतु सध्या कळत- नकळत आणि आक्रमक वेगाने वाढणाऱ्या विदेशी वनस्पती पर्यावरण आणि आयुर्वेदासाठी गंभीर आव्हान उभे राहत आहे.
ह्या आक्रमक परकीय प्रजाती (Invasive Alien Species) ची अवास्तव वाढ पर्यावरणी आणि स्थानिक औषधी वनस्पतींचे अस्तित्वच धोक्यात आणत आहे. ह्या वनस्पती मातीची गुणवत्ता, पाण्याचा प्रवाह, परागण प्रक्रियांमध्ये बदल निर्माण करतात काही रासायनिक बदल घडवून आणतात, ज्यामुळे देशी वनस्पतींची वाढ होत नाही परिणामी देशी वनस्पती नामशेष होताना दिसत
आहेत.
परकीय आक्रमक प्रजातींची वाढ ही केवळ पर्यावरणीय समस्या नाही — तर ती आयुर्वेदाच्या अस्तित्वाला थेट आव्हान आहे. स्थानिक औषधी संपत्तीचे संरक्षण म्हणजेच आयुर्वेदाचे संरक्षण होय.या परिषदेचे आयोजन – शिव इंटरनॅशनल फ्रटनिटी आफ आयुर्वेद- सिफा -भारत, शिव आयुर्वेद व योग -सिंगापूर, आयुष विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व भारतीय दूतावास, व्हिएतनाम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेत जगभरातील विविध देशांतील आयुर्वेद व योगाभ्यासकांनी सहभाग नोंदविला होता. त्याबद्दल डॉ शितल जाधव यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सचिव तथा सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य बाबासाहेब पाटील,उपाध्यक्ष दिपाली जाधव,सहसचिव अविनाश जाधव, भिंगोले गुरूजी, तसेच प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील, द्रव्यगुण विभाग प्रमुख डॉ.एस आर श्रीगिरे डॉ.वर्षा वैद्य तथा सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



















