सोलापूर – जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमारी गटात करमाळ्याच्या कमलादेवी क्लबने व कुमार गटात येथील माता स्वरूपाराणी क्लबने विजेतेपद पटकाविले.
पार्क स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात कुमारी गटात कमलादेवीने केबीपी पंढरपूरवर मात केली. कुमार गटात माता-सरुपाराणी क्लबने श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लबला हरवले.
सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन व श्रीराम स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा येथे संपन्न झाली. कुमार गटात ३५ व कुमारी गटात १५ संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंची २५ ते ३० नोव्हेंबरला पुणे येथे राज्य स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.


















