बार्शी – जिल्हा परिषद सोलापूर आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये लंगडी लहान गट मुले या प्रकारात जि.प. शाळा पानगाव क्र. १ च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सलग तिसऱ्या वर्षी तालुका प्रथम क्रमांक मिळवत विजयाची हॅट्रिक करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
अंतिम सामन्यात पानगाव नं १ च्या मुलांनी खांडवी मुले शाळेचा जवळपास डावाने पराभव केला. यशस्वी विद्यार्थी यांचे गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके, विस्तार अधीकारी बावकर, जयसिंगराव देशमुख सरपंच पानगाव, बालाजी पवार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पानगाव, केंद्रप्रमुख सुधीर कुलकर्णी, मुख्याध्यापिका मिनाक्षी पवार, सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आणि पुढील जिल्हा स्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या सर्व विदयार्थ्याना मुख्याध्यापिका. मीनाक्षी पवार, उर्मिला शिंदे, सुरेखा हंगे, रुक्मिणी गोकळे, कल्पना उकिरडे, शिवाजी पवार आणि सुधीर कुलकर्णी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
























