नांदेड – दक्षिण मतदार संघामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापले आहे. यामध्ये धनुष्यबाणच चालेल त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार करा ज्या ठिकाणी माझी आवश्यकता आहे त्या ठिकाणी मला बोलवा असे प्रतिपादन जवाहर नगर येथे दिनांक १६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आ. हेमंत पाटील यांनी केले.
आगामी चालू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण जोरदार तापले असून नांदेड शहरालगतचे नव्याने झालेले धनेगाव सर्कल जिल्हा परिषद निवडणूक अनुषंगाने आरक्षण सोडत नंतर हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलासाठी राखीव असल्याने.
या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी आपापले शक्ती प्रदर्शन करत सर्कलमध्ये मतदारांशी भेटीगाठी घेऊन त्यांच्या विकासात्मक कामे , वैद्यकीय सेवा या प्रकारचे मतदारापर्यंत योजना पुरवणी हे ध्येय मतदारासमोर ठेवून आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटाचे त्याने गाव सरकार मधील इच्छुक उमेदवारांनी प्रचार व प्रसार मतदारापर्यंत जाऊन त्यांना आपण केलेल्या कामाचे दाखवून देऊ मला परिवर्तन करा मतदान हे धनुष्यबाणालाच मिळाली पाहिजे यापूर्वीही दक्षिण मतदार संघात धनुष्यबाणाला मतदारांची मोठ्या प्रमाणात पसंती असल्याने या ठिकाणी शिवसेना शिंदे गट धनुष्यबाणाला येथील मतदार पसंत करते आणि धनुष्यबाण हे विजयी होईल यात काही शंका नाही असे मत आमदार हेमंत पाटील यांनी जवाहर नगर येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते .
या बैठकीसनांदेड तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील कदम, माजी पंचायत समिती सदस्य दाजीबा राठोड, सर्कल प्रमुख बालाजी पाटील भायेगावकर, काकांडी उपसरपंच सुदिन बागल, दत्ता पाटील कदम, सेवानिवृत्त सैनिक मनोहर कदम, सिडको उपशहर प्रमुख पप्पू गायकवाड, नामदेव पुयड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी उपस्थित मान्यवराची मार्गदर्शनपर भाषणे झाली तर प्रास्ताविक सर्कल प्रमुख बालाजी पाटील भायेगावकर यांनी केले. सूत्रसंचालन मुरली पाटील पुयड यांनी केले.


















