सांगोला – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उन्मेष सृजनरंग युवा महोत्सवामध्ये सांगोला महाविद्यालयाच्या संघाने लोकनृत्य व लावणी मध्ये विभागून द्वितीय, एकाकिका, लघुनाटिका, पथनाट्य, शोभायात्रा, कातरकाम, काव्यवाचन मध्ये द्वितीय, पाश्चिमात्य समूह गायन, वादविवाद, मूकनाट्य, मेहंदी मध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. तसेच महाविद्यालयाची चिट्टी एकाकिका चांगलीच गाजली. या एकाकीकेतील नायिका मनीषा हिची भूमिका साकारलेल्या श्रुती घाडगेला स्त्री अभिनयाचे द्वितीय पारितोषिक मिळाले.
सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.केदारनाथ काळवणे, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.राजेंद्र वडजे, सांगोला तालुका उच्चशिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष ता.ना. केदार, उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, खजिनदार नागेश गुळमिरे, सचिव अँड.उदयबापू घोंगडे, सहसचिव साहेबराव ढेकळे, संस्था सदस्य विश्वनाथ चव्हाण, म.सि.झिरपे, सोमनाथ ढोले, रावसाहेब ताठे, डॉ.संजीवनी केळकर, शामराव लांडगे, सुरेश फुले, प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष लोंढे, डॉ.रामचंद्र पवार, प्रा.प्रसाद लोखंडे, प्रा.डॉ.नवनाथ शिंदे, प्रा.एम.एस.बडवे, प्रा.विशाल कुलकर्णी, डॉ.सदाशिव देवकर, डॉ.विद्या जाधव, प्रा.अपूर्वा गोपालकर, प्रा.रोशनी शेवाळे, प्रा.तेजश्री मिसाळ, प्रशिक्षक डॉ.सिद्धार्थ सोरटे, अँड.मारुती वाघमोडे, धनंजय काजोळकर, प्रकाश पवार, विजय आलासे, रितेश साळवे, दिग्विजय जावीर, सिद्धनाथ जावीर, गोरख जावीर, प्रतिक काटे, डॉ.विजयकुमार गाडेकर, डॉ.विधीन कांबळे, डॉ.आर.आर.ताठे, शारीरिक शिक्षण संचालक जगदीश चेडे, अधिक्षक विलास माने, लिपिक प्रकाश पैलवान, बापू इंगोले, तानाजी दिघे, मनीषा सावंत, प्रसाद शेंडे, सतिश माने, रेक्टर सुरेखा सुरवसे, शंकर माने यांनी युवा महोत्सव महाविद्यालय संघासाठी विशेष परिश्रम घेतले.
सांगोला महाविद्यालयाचा यशस्वी संघ
सेजल कवठेकर, प्रज्ञा केंगार, राजलक्ष्मी केदार, रितेश धनवडे, स्वाती हजारे, ऋषिकेश खंडागळे, श्रद्धा चाराटकर, रोहित सावंत, प्रतीक्षा माने, तृप्ती सुर्यगन, मोनिका लांडगे, साक्षी कदम, मेघा भागवत, प्रियांका सावंत, ईशा पाखमोडे, लीलावती खंडागळे, राज होणमुटे, भक्ती डांगे, भगवंत कोळी, प्राप्ती बागडे, प्रतीक्षा यादव, रोहन गोरे, आर्यन माने, सायली भोसले, सलोनी रणखांबे, वैष्णवी रांजवणे, आकांक्षा जाधव, आदिती लिगाडे, श्रुती घाडगे, शीतल चव्हाण, वैष्णवी चौगुले, आकिब तांबोळी, स्वाती पाटकुलकर, राधा गाठाळ, मनीषा थोरबोले, निलेश कोळी, सुमित होणमुखे, सदानंद गेजगे, अशोक ऐवळे


















