भोकरदन : सिल्लोड कॉर्नरवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात नगर परिषदच्या वतीने नुकतेच स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा रविवारी 18 रोजी दुपारी 3.00 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते व पूज्य भदंत एस प्रज्ञाबोधी महाथेरो व पूज्य भदंतशिवली शाक्यपूत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विशेष म्हणजे स्मारकात प. पू.बो. डॉ बाबासाहेब आंबेडकरस्मारक समिती व जनतेच्या सहभागातून उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन ही होणार आहे.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तर प्रमुख अतिथी म्हणून खा डॉ कल्याणराव काळे उपस्थित राहणार आहेत. तर पाहुणे म्हणून आ संतोष दानवे,एस के भंडारे, माजी आ चंद्रकांत दानवे,सुदामराव सदाशिवे,सुधाकरभाई निकाळजे,विलास डोळसे, डॉ संजय पगारे, महेंद्र बनकर, डेव्हिड घुमारे, राजाभाऊ देशमुख, ऍड हर्षकुमार जाधव, आशाताई माळी,चंद्रकांत पगारे,मुकेश चिने, इरफानोद्दीन सिद्दीकी यांच्यासह उपविभागीय अधिकारी डॉ दयानंद जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे, तहसीलदार संतोष बनकर,
मुख्याधिकारी संतोष वाघमारे, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर, पोलीस निरीक्षक किरण बिडवे,अभियंता किशोर ढेपले,कॉन्ट्रॅक्टर विजय बनकर,शिल्पकार नंदकुमार हुंबे आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व बांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनप पू बो डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,भारतीय बौद्ध महासभा,डॉ बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन,सम्राट अशोक नवयुवक मित्रमंडळ,सम्राट भोगवर्धनबुद्ध विहार समिती,सुजाता महिला मंडळ व सर्व बौद्ध समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.