सोलापूर – होटगी स्टेशन, हिपळे, आहेरवाडी, तिल्हेहाळ आणि बोरूळ या गावांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बुधवारी मोठया उत्साहात, वाजत गाजत संभाजी आरामारच्या शाखाचे उदघाटन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मागील 17 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी विचारधारा प्रत्यक्षात आणत संभाजी आरमार जनतेसाठी सातत्याने कार्यरत आहे. संभाजी आरमारचे शेकडो मावळे हा शिव विचारांचा रयत हिताचा वसा प्रामाणिकपणे जोपासत आहेत. त्यामुळेच सर्वदूर उत्स्फूर्तपणे संभाजी आरमार विस्तारतच आहे. या शाखांच्या माध्यमातून नव्याने शेकडो कार्यकर्ते संभाजी आरमारच्या सैन्यात सामील झाले आहेत. या युवा शक्तीचा उपयोग युवकांना निर्व्यसनी बनवत सक्षम बनवण्यासोबतच जनहितासाठी करून संभाजी आरमार मजबूत आणि शिव विचार बुलंद करण्यासाठी करू अशी माहिती डांगे यांनी दिली.



















