परतूर / जालना – परतूर येथे आज अक्षय कोटेक्स जिनिंग फॅक्टरीमध्ये सीसीआय च्या हमी भाव कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन भाजपा प्रदेश सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहुल लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रथम पाच शेतकऱ्यांनी आणलेल्या कपाशीच्या गाड्यांचे पूजन करून मानाच्या शेतकऱ्यांना फेटा बांधून राहुल लोणीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कापसाला 8060 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव देण्यात आलेला असून यावेळी बोलताना भा ज पा प्रदेश सचिव राहुल लोणीकर म्हणाले की, यार्डात कापूस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होता कामा नये, जेणेकरून शेतकरी आपला कापूस सीसीआयच्या हमीभाव केंद्रावर भिंत कंपनी आणिल शेतकऱ्यांना याबाबतीत कुठलीही अडचण आल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती सह थेट माझ्याशी संपर्क करावा.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्यामुळे शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.
यावेळी प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्यासह उपसभापती संभाजी वारे आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शत्रुघ्न कणसे, उपसभापती रवींद्र सोळंके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपत टकले संचालक पाराजी मुळे दिनेश होलानी पद्माकर कवडे सत्यनारायण अग्रवाल, नितीन जोगदंड माऊली तनपुरे प्रशांत बोनगे विजय वाणी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संभाजी घनवट सनी तनपुरे गजानन लिपणे सुधाकर बेरगुडे, बाळासाहेब ढवळे पिंटू काका ढवळे, माधव सिंग जनकवार, अक्षय कोटेक्स चे संचालक दिलीप नहार, अक्षय नहार सीसीआयची श्री सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री रामकिसन लिपने श्री डोंगरे, श्री कादे यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती




















