धाराशिव – येथील प्रभाग चार मध्ये आनंदनगर पोलीस स्टेशन समोरील पेट्रोल पंप ते अष्टविनायक चौक हा तेथील जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा व सोयीस्कर असलेल्या रोडच्या कामाचा शुभारंभ दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी नगराध्यक्षपदी विराजमान होताच तातडीने कामाला लागलेल्या भाजपच्या नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
नगररत्थोनच्या 147 कोटी रुपयांच्या अंतर्गत असलेल्या निधीतून सदर रोड चे काम उत्कृष्टरित्या होणार असून,
धाराशिव शहरातील रस्ते कामांना देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती रद्द झाल्याने शहरातील ५९ रस्त्यांची कामे आता युद्धपातळीवर होणार आहेत.
धाराशिव शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आदरणीय आमदार राणादादांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी नगरोत्थान योजनेतून शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल ₹११७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील ५९ रस्ते व नाल्यांची कामे करण्यात येणार असून ,
नगरपरिषद निवडणुकीनंतर लगेच कामाला सुरुवात करण्यात आली असून, औपचारिक शुभारंभ करण्यात आला आहे.
यावेळी नूतन नगराध्यक्षा सौ.नेहाताई काकडे, श्री.अमित शिंदे, यांच्यासह प्रभागातील नगरसेवक श्री.अभिजित काकडे, सौ.राणीताई दाजी पवार, गणेश घोडके, सनी पवार यांच्यासह नगर परिषदेतील मा.नगरसेवक, चंद्रकांत काकडे, नितीन काकडे, भाऊसाहेब कोळी, डॉ.शिंदे, डॉ.माने व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व या भागातील नागरिक उपस्थित होते.
याबाबत भाजपचे यशस्वी नगरसेवक खास लक्ष ठेवून या सोबतच येतील नियोजित पद्धतीने कामाला सुरुवात करत असल्याने जनतेतून त्यांच्या प्रति सद् भावना निर्माण झालेली आहे.

























