सोलापूर – माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती येथे पिलीवचे माजी सरपंच संग्राम पाटील यांच्या प्रयत्नातून हैदराबाद येथील हेरिटेज फुडस कंपनीच्या वतीने दुध संकलन व शीतकरण प्लांटचे उद्घाटन कंपनीचे सरव्यवस्थापक मोहनराम सांगी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉक्टर जंगम सांगा मुर्ती, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशदादा पाटील, राजेंद्र काकडे, माजी सरपंच संग्राम पाटील, माजी सरपंच अमोल मदने पाटील, माजी उपसरपंच तथा नागरी आघाडीचे अध्यक्ष आरिफखान पठाण, उमेशभाऊ सरवदे,कल्याण बापु जावळे,दुर्योधन जगदाळे,गोरख जरग गोविंदभैस,श्याम तात्यामदने ,कुमारभैस,दुध उत्पादक शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोहनराम सांगी म्हणाले या दुध संकलन व शीतकरण केंद्राकडून इतर केंद्रापेक्षा दर चांगला दिला जाईल. दुधाच्या प्रमाणात पशुखाद्य तसेच जनावरे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येईल.
जनावरांच्या देखभालीसाठी तज्ञ डाॅकटरांची नेमणुकी,कंपनीच्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यात येतील, दुध उत्पादक शेतकऱ्यांना दर दहा दिवसानी बिल देण्यात येईल असे सांगितले. पिलीव परीसरात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय आहे .यामुळे शेतकऱ्यांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल.
फोटो. _ झिंजेवस्ती येथे दुध संकलन व शीतकरण केंद्राचे उद्घाटन करताना मोहनराम सांगी,संग्राम पाटील, आरिफखान पठाण, व इतर मान्यवर.