सोलापूर : भारतीय जैन संघटना, राऊंड टेबल आणि छत्रपती शिवाजी महाराज शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ५ व ६ डिसेंबर रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्यातील १० ठिकाणी असे शिबिरे घेतले असून सोलापूर शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. जत, सांगली, वैराग, बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, धाराशिव, मंगळवेढा आणि आसपासच्या अनेक भागांतून रुग्णांनी उपस्थित राहून शस्त्रक्रिया सेवा घेतली आहे.
हे शिबिर स्व. महेंद्र शहा व स्व. डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संपन्न झाले. शिक्षण, सामाजिक कार्य, जलसंधारण आणि आपत्ती व्यवस्थापन, शैक्षणिक या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या बीजेएसने राज्यभर अशा वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीजेएसचे राज्याध्यक्ष केतन शहा होते. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये अमेरिका स्थित प्लास्टिक सर्जरी तज्ञ डॉ. राज लाला, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, डॉ. सचिन जाधव, डॉ. सचिन स्वामी, डॉ. अर्गजा चिटणीस, डॉ. तोडकर, बीजेएसचे राज्य सचिव संतोष बंब, राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील, प्रवीण बलदोटा, राऊंड टेबल – SHRT 309 चे चेअरमन आशिष तापडिया, सचिव अभिषेक झंवर, तसेच तरंग शहा, अभिजित मालाणी, धनंजय गोडबोले, पुष्कराज कोठारी, अश्विन मुंदडा, विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभुते, जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे आदी मान्यवरांचा समावेश होता.
आपल्या मनोगतात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिर आयोजित करून बीजेएसने गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे.” तसेच भविष्यातही अशा संयुक्त शिबिरांचे आयोजन करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
या शिबिरामध्ये ज्योती शहा, ख्याति शहा, कोमल पाचोरे, प्रशांत वर्धमाने, अशोक भालेराव, निशा गांध, प्रिया पाटील, महावीर नळे, मानसी शहा, पल्लवी मेहता आणि ओम पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आभार प्रदर्शन राऊंड टेबलचे चेअरमन आशिष तापडिया यांनी केले.
























