सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ दूध यांच्या ‘शितकरण केंद्र’ प्रक्रिया युनिटचे उद्घाटन चेअरमन सारीका पाटील यांच्या हस्ते पार पडला.
गोकुळने श्री स्वामी समर्थ महिला दूध उत्पादक संस्थेला दूध संकलन व सेवा केंद्र म्हणून मान्यता दिली असून, हे गोकुळचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले केंद्र ठरले आहे. विंचूर येथील हे केंद्र आता गोकुळसाठी दूध संकलन आणि शेतकऱ्यांना सेवा पुरवण्याचे महत्त्वाचे काम करणार आहे.
या केंद्रांमुळे सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना कोल्हापूरच्या धर्तीवर दूध दर आणि अन्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोकुळचे स्वनिर्मित उच्च दर्जाचे पशुखाद्य हे कोल्हापूरच्या दरानेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
यावेळी ‘श्री स्वामी समर्थ महिला सहकारी दूध उत्पादक संस्थे’चे सचिव बाळासाहेब पाटील, सहाय्यक शितकरण केंद्राचे व्यवस्थापक शिवाजी पाटील, संगणक सहाय्यक व्यवस्थापक एकनाथ पाटील, गुणनियंत्रक अधिकारी सुशील देसाई, सहाय्यक अधिकारी क्रांतीकुमार माने, स्वप्निल पाटील, काळप्पा सुतार, यतीराज निगपुडे, बाळाप्पा व्होनमाने, डॉ. आदिनाथ खरात, डॉ. महेश खरात, शिवानंद उमदीकर, सिद्धाराम घोंगडे, श्रीमंत पुजारी, चिदानंद म्हेत्रे, महासिद्ध घोडके आदी उपस्थित होते.



















