अक्कलकोट – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट व सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 31वी ज्युनियर मुले व मुली राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेचे उद्घाटन शांती एज्युकेशन सोसायटीचे सचिव सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पाटील यांच्या शुभहस्ते व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष मा.नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच, प्रमुख उपस्थिती म्हणून, राज्य सचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.प्रदीप तळवेलकर गुरुजी, युवा नेते प्रथमेश इंगळे ,उपाध्यक्ष संतोष गवळी, यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला
याप्रसंगी वेस्ट बंगाल येथे झालेल्या 47 व्या वरिष्ठ पुरुष महिला राष्ट्रीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत राज्याच्या महिला संघाने सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व महिलांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील 30जिल्ह्यातील
900 खेळाडूंचा सहभाग नोंदविला
या उद्घाट्याच्या कार्यक्रम प्रसंगी राज्य तांत्रिक समिती प्रमुख गोकुळजी तांदळे सांगली जिल्हा सचिव अभय बीराज ,पुणे शहर सचिव अतुल शिंदे ,परभणीचे सचिव प्रसन्नजीत बनसोडे, धाराशिव सचिव अनिल धोत्रे अकोला शहर सचिव रामेश्वर राठोड पालघर चे क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रितिश पाटील अंकुश केत मालक ,रमेश शिंदे, चंद्रकांत सोनटक्के, श्रीकांत झिपरे हे उपस्थित होते
या स्पर्धेसाठी पंच म्हणून संतोष आवचार ,गणेश भेटूदे ,भीमा मोरे, कल्पेश कोल्हे सोमनाथ नलावडे शेषराज वानखेडे विकास वानखेडे संकेत पावले स्वप्निल गदादे भावना कोळी माधुरी महाजन अजूनही पंचांची भूमिका निभावली
या स्पर्धेचे आयोजन व नियोजन समितीचे अध्यक्ष श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मा.नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेशजी इंगळे , सॉफ्टबॉलचे सचिव स्पर्धा सचिव प्रा.संतोष खेंडे , उपाध्यक्ष वसीम शेख, मारुती घोडके , खजिनदार गंगाराम घोडके, मारुती घोडके,परमेश्वर व्हसुरे संचालक श्रीधर गायकवाड, रवींद्र चव्हाण, प्रशांत राणे, प्रबुद्ध चिंचोलीकर , संतोष पाटील, प्रशांत कदम, सिताराम भांड सागर जगझाप, महादेव वाघमारे, समर्थ आहेरवाडी अनिकेत कांबळे हे करीत आहेत
आजचे निकाल मुले
1)सोलापूर मनपाविरुद्ध छत्रपती संभाजी नगर 5 _ 0 होमरन
२) नवी मुंबई विरुद्ध अमरावती 5 _ 0 होमर न
मुली
१)जळगाव विरुद्ध धाराशिव 10_0 होम रन
2) नवी मुंबई विरुद्ध ठाणे 10_ 3 होमरन
3) परभणी विरुद्ध पुणे 5_ 1 होमरन


















