सोलापूर – श्री सोमेश्वर हायस्कूल हत्तुर येथे आंतर शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शिवयोगी सर होते.
प्रशालेचे माजी विद्यार्थी ओंकार काळे संदीप काळे व राम कुंभार यांची नुकतीच एम.एस.एफ मध्ये निवड झाली असून त्यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. व त्यांच्या हस्ते क्रिकेटच्या सामन्याचे उदघाटन करण्यात आले. संजना राठोड यांनी क्रीडा शपथ घेतली आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे नियोजन प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री व श्री विकास खुने यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बिराजदार सर यांनी केले आभार श्री अचलेरे सर यांनी मानले.

















