अक्कलकोट – भारत देश हा ग्रामीण संस्कृती जतन करून वाटचाल करणारा देश आहे. द्वापार युगापासून खेळ व क्रीडा प्रकारे या देशाची अविभाज्य घटके आहेत, त्यामुळे या खेळाडूंना प्रोत्सहान देण्याची वाटचाल आजच्या कलियुगातही नेटाने सुरू रहावी याकरीता प्रयत्न चालू ठेवणे आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. खेळ व क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून खेळाडूंनी देशाचे नांव अंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल करण्याकामी खेळाडूंना श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती कडून नेहमीच प्रोत्सहान व मदत करण्यास आपण तत्पर असल्याचे प्रतिपादन देवस्थानचे चेअरमन व मा.नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. आज येथील राजे फत्तेसिंह क्रीडांगणावर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट व सोलापूर जिल्हा सॉफ्टफुटबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, पेंटॅक्यू व डॉजबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मुले व मुलींच्या सब जुनियर ज्युनियर व सीनियर खेळाडूंच्या डॉजबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, पेंटॅक्यू, सॉफ्ट फुटबॉल अशा ४ खेळांच्या तसेच
पुरुष व महिला खेळाडूंच्या नऊ गटांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्धाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेश इंगळे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर युवा नेते प्रथमेश इंगळे, सॉफ्ट फुटबॉलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजिनाथ हत्तुरे, टेनिस व्हॉलीबॉलचे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण, राज्यसचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते एकनाथ साळुंके, राज्य सचिव प्रदीप साखरे, टेनिस व्हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे, उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, सहसचिव मकरंद कोराळकर, सहसचिव प्रा.राकेश शिंदे, रवींद्र गुडे विविध जिल्ह्याचे सचिव पंच प्रशिक्षक पदाधिकारी, आदींसह प्रथमेश इंगळे
मित्र परिवारातील दर्शन घाटगे, समर्थ स्वामी, आदीत्य गवंडी, धनराज स्वामी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजन व नियोजन जिल्हा सचिव व सॉफ्टफुटबॉल खेळाचे जनक प्रा.संतोष खेंडे, खजिनदार गंगाराम घोडके, उपाध्यक्ष वसीम शेख, इकबाल दलाल, परमेश्वर व्हसुरे संचालक श्रीधर गायकवाड, रवींद्र चव्हाण, प्रबुद्ध चिंचोलीकर, संतोष पाटील, प्रशांत कदम, सिताराम भांड, सागर जगझाप हे करीत आहेत.
फोटो ओळ – फत्तेसिंह क्रीडांगणावर डॉजबॉल, टेनिस, व्हॉलीबॉल, पेंटॅक्यू, सॉफ्ट फुटबॉल राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे शुभारंभ करताना व मान्यवरांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

















