नवीन नांदेड – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील क्ष-किरण विभागांमध्ये आधुनिक व उच्च क्षमतेच्या कंपनीची सिटीस्कॅन मशीनचा शुभारंभ दिनांक १५ डिसेंबर रोजी कार्यान्वित करण्यात आला. यावेळी जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांनी या मशीनची पाहणी केली. या मशीन मुळे चार जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना लाभ मिळणार आहे.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी पासून अत्याधुनिक व उच्चक्षमतेची सिटीस्कॅन मशीन नव्याने चालू करण्यात आली आहे . या मशीन द्वारे अचूक उच्च रिझोल्युशन प्रतिमा देणारी असून कमीत कमी वेळात शरीराची तपासणी करता येते. सदरील मशीन द्वारे रुग्णांचे मेंदूचे आजार, स्टॉक, मेंदूतील रक्तस्त्राव, हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार, छाती व पोटातील गंभीर गुंतागुंतीचे आजार, अन्ननलिकेतील आजार, फुफुसातील अंतर्गत गाठीचे आजार तसेच अपघातातील अंतर्गत दुखापतीचे निदान लावण्यास मोठी मदत या मशीनद्वारे होईल.
नांदेड जिल्ह्यात अशा प्रकारची उच्चक्षमतेची मशीन एकमेव डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे आज घडीला उपलब्ध आहे. तरी नांदेड जिल्ह्यात व परिसरातील लगतच्या जिल्ह्यातील हजारो रुग्णांच्या तपासण्या करण्यास मदत होनार असल्यामुळे या मशीनच्या लाभ रुग्णाला मोठ्या प्रमाणात होणार आहे.
यावेळी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, डॉ. अमित पंचमहालकर, डॉ. अनिल तापाडिया, प्रा. डॉ. एस. आर. मोरे, प्रा. डॉ. वैष्णवी कुलकर्णी प्रा. डॉ. किशोर राठोड, प्रा. डॉ.क्रांतीलाल चंडालिया, प्रा. डॉ. कपिल मोरे, डॉ. उबेद खान, उपवैद्यकीय अधीक्षक प्रा. डॉ. अजय वराडे यांच्यासह रुग्णालयातील खुशाल विश्वासराव संजय वाकडे प्रशासकीय अधिकारी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल घुगे व डॉ. धनंजय मोरे व श्रीमती अलकंदा कुलकर्णी, सतीश इंगळे यांच्यासह महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती


























