सोलापूर – वर्ल्ड ऑफ वूमेन या महिला संस्थाच्यावतीने श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रेमध्ये महिलामार्फत चालविल्या जाणाऱ्या फूड स्टॉलचे उदघाटन खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्ष विद्या लोलगे यांच्या प्रेरणेतून हा स्टॉल सुरु करण्यात आला आहे.
या फूड स्टॉलमध्ये स्वच्छ, ताजे व खमंग, रुचकर खाद्यपदार्थ भाविकाना वाजवी दरात पुरविले जाणार आहेत. तरी गड्डा यात्रेमध्ये येणाऱ्या भाविक भक्तानी गाळा नं. 11ला भेट द्यावी असं आवाहन खासदार प्रणितीताईंनी यावेळी केले आहे.या अभिनव उपक्रमlचे त्यांनी कौतुक केले आहे.
या स्टालचे संयोजन मार्था आसादे, प्रिया कुलकर्णी, सावित्री शिवशरण, गीता मुळे, रेश्मा शेख, कृतिका हुंगुण्ड, साधना भापकर, मनीषा नलावडे, सुनंदा साळुंखे, शोभा गायकवाड, कांचन चौगुले, सारिका लlमकाने, स्वाती मुकणार, शबाना शेख, सायरा शेख, लता ढेरे, शारदा मसुदी, उमा चिपन्हाट्टी, ऋतुजा काटकर या सर्व महिला करताहेत.
























