सोलापूर – राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून चालविण्यात येणार्या मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यासह आणि वसतिगृहात राहत असलेल्या मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठीच्या भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे.
या वाढीव निर्वाह भत्त्याचा मुलांना तर मुलीसाठी स्वच्छता प्रसाधनाच्या भत्त्यामुळे सामाजिक न्याय विभागातील वसतिगृहात मुक्कामाला राहणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना होणार आहे. याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे .
विद्यार्थिनींसाठी मिळाणारी स्वच्छता प्रसाधन भत्त्यात वाढ करण्यात आले आहे. मुलींच्या प्रसाधनासाठी १००. रुपयांवरून १५० रुपये केला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून वाढीव भत्ता लागू करण्यात आला आहे. राज्यात ६५१ वसतिगृहे, क्षमता ४३ हजार ८५८ राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शासकीय वसतिगृह चालवली जाते. त्यात मुलांचे २३० वसतिगृहात २३ हजार २०८ तर मुलींच्या २१३ वसतिगृहात २० हजार ६५० मुली मुक्कामाला राहून शिक्षण घेत आहेत.
६५१ वसतिगृहातील विद्यार्थी क्षमता ही ४३ हजार ८५८ विद्यार्थ्यांची आहे. ६५१ शासकीय वसतिगृहात एकूण ४३ हजार ८५८ विद्यार्थ्यांचे राहण्यासह जेवणाची व्यवस्था करण्यात येते. या विद्यार्थ्यांना आता निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधनाच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. वाढीव, भत्त्यामुळे अनुसूचित जाती मधील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.