सोलापूर : सार्वजनिक शौचालयाचे निष्कृष्ट दर्जाचे काम करून बिल उचलणारे अधिकारी मनोज मसलखांब यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे
या मागणीसाठी आर.बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे वैभव शिंदे, नानेश्वर बागडे यांनी ३ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट समोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आले आहे.
मुकुंदनगर, मराठा वस्ती या ठिकाणी ५१ सार्वजनिक शौचालय असून हे ६० वर्षांपूर्वीचे आहे. यामध्ये दुरुस्ती करिता ८ लाख ४१ हजार ८१८ इतके रक्कम रुपये सन २०२२ मध्ये मंजूर झाले होते. मात्र 20 हजाराचे ही काम न करता तत्कालीन अधिकारी मनोज मसलखांब बिल उचलेले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांचे कारवाईचे आदेश असतानाही कारवाई केली गेली नाही. यामध्ये वेळोवेळी निवेदन देऊन हलगी आंदोलन करून कोणती कारवाई झाली नाही. माहिती अधिकारच्या माध्यमातून माहिती मागणी केली असता संबंधित ठेकेदारांचे कागदपत्र व नाव दिले नाही.
लक्ष्मी सेल्स कार्पोरेशनचे मक्तेदार यश चंडक हे काम करतेवेळी उपस्थित होते. निष्कृष्ट दर्जाचे काम करून बिल उचलण्यात आलेले आहे. तात्काळ मनोज मसलखांब व ठेकेदार यांना निलंबित करून बिल वसूल करून जीर्ण झालेले सार्वजनिक शौचालय नव्याने बांधण्यात यावे अन्यथा या भागातील नागरिकांचे जीव जाण्याची शक्यता नाकारता करता येत नाही. या संदर्भात तात्काळ कारवाई करण्यात यावी,अशी आंदोलनकर्त्यांसह विश्वभूषण कांबळे यांची मागणी आहे.
























