सोलापूर – भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान व इतर मागास बहुजन कल्याण विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुलांचे शासकीय वसतिगृह १३/१२ , बंजारा सोसायटी, आर. टी.ओ. च्या पाठीमागे विजापूर रोड, सोलापूर येथे २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्य वक्ते प्रा. धन्यकुमार बिराजदार सिनेट सदस्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ , प्रमुख पाहुणे इतर मागास व बहुजन कल्याण विभाग सोलापूर सहाय्यक आयुक्त गणेश सोनटक्के हे उपस्थित होते त्याचबरोबर क्लास टू ऑफिसर श्री श्रीकांत आव्हाड, यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री सुनील पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर विद्यार्थ्यांचे मनोगत झाले.
कु. मौला शेख, कु. सागर डीडोळे यांनी संविधान दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले, यानंतर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्रा. धन्यकुमार बिराजदार यांनी संविधान दिनानिमित्त मुख्य भाषण केले त्यानंतर इतर मागास व बहुजन कल्याण विभाग सोलापूर सहाय्यक आयुक्त गणेश सोनटक्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सविधान प्रास्ताविक सामूहिक वाचन करण्यात व कु. कार्तिक राठोड या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. यावेळीश्री.शितल कंदलगावकर, निरीक्षक श्री सचिन कांबळे, श्री. सी. के. जाधव, संजय राठोड हे उपस्थित होते



















