सोलापूर – एन.ए.बी. संचलित मा.सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर अंधकार्यशाळेत भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नॅब संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश कदम सर तर प्रमुख पाहुणे जिल्हा कोषागार अधिकारी, सोलापूर वैभव राऊत हे होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांकडून संविधानाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना अंधकार्यशाळेचे अधिक्षक रामचंद्र कुलकर्णी सरांनी केली. रामचंद्र कुलकर्णी सरांनी भारताचे संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कशी लिहिली, संविधानामुळे देशाची प्रगती व संस्थेविषयी माहिती सांगितली . शिवशरण गडदरे व गुणानंद बिहाडे यांनी डॉ.आंबेडकर साहेबांची स्तुतीपर गीत गायली. विद्यार्थ्यांमध्ये हर्षद पुंडगे, प्रकाश काळे व दीपांजली केसकर यांनी आपले विद्यार्थी मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे वैभव राऊत सरांनी संविधान आपल्या देशासाठी कशी महत्त्वाची आहे, आपल्या देशामध्ये संविधानाचे महत्त्व, तत्वे व नियम याविषयी व आपल्या देशात होणारे त्यांची अंमलबजावणी यावर विस्तृतपणे विद्यार्थ्यांना सांगितले. अंकुश कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानाचे महत्त्व सांगितले.
सदर कार्यक्रमास रियाज मुल्ला व आकांक्षा भंडारे यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमास श्रीनिवास समदूर्ले व शुभम वांझरे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवशरण गडदुरे यांनी केले.



















