पंढरपूर – भारताचा विकास हा न टाळता येण्याजोगा विषय आहे येत्या काही दिवसांत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था आर्थिक महासत्ता असलेला देश असेल,
ट्रम्प टेरीफ मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कोणताही धोका नाही.आपल्या देशाचे भवितव्य अतिशय उज्वल आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ.शैलेंद्र देवळणकर यांनी केले.
ते पंढरपूर अर्बन बँक आयोजित देशभक्त बाबुराव जोशी बौद्धिक व्याख्यानमालेत पहिले पुष्प ट्रम्प टेरिफ आणि भारत, या विषयावर बोलत असताना केले,
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रशांत परिचारक, बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्षा सौ माधुरी जोशी, हरीश ताठे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ शैलेंद्र देवळणकर म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०वर्षात ८२देशांना भेटी दिल्या म्हणून टीका केली जाते.

पण देशाचे आर्थिक हितसंबंध, व्यापार वाढवायचा असेल तर यापेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या पाहिजेत, जागतिक पातळीवर प्रभाव वाढविण्यासाठी विदेश दौरे आवश्यक आहेत.
जगाच्या आर्थिक बाजारपेठेत भारतीय नागरिकांचे महत्वाचे योगदान आहे, अमेरिकेत ५२लाख भारतीय राहतात, एकूण विद्यार्थ्यांपैकी एक तृतीयांश विद्यार्थी हे भारतीय असून भारतामुळे
मोठ्या प्रमाणात कररूपी उत्पन्न अमेरिकेस मिळत आहे.
संपूर्ण जग हे आता एक कुटुंब बनले असून प्रत्येक घटकावर जागतिक राजकारणाचा परिणाम जाणवणार आहे, रशिया युक्रेन युद्धाच्या झळा भारतासह ईतर देशांना सोसाव्या लागत आहेत. दहशतवादी हल्ले हे आता केवळ जम्मू काश्मीर आणि दिल्लीपर्यंतच मर्यादित राहिलेले नसून ते आपल्या पर्यंत येणार आहेत.
रशिया कडून भारताने पस्तीस अब्ज डॉलर चे कच्चे तेल घेतल्याने आज पेट्रोल च्या किंमती स्थिर आहेत, अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता रशिया कडून तेल घेतल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडला असून इगो दुखावला आहे यामुळे टेरिफ वाढविले असून याचा फटका सोलापूर कापड उद्योगाला बसला आहे.
अमेरिकेचे सफरचंद किंवा बदाम जेनेटिकली मॉडी फाईड असल्याने त्यातील पोषणमूल्ये कमी आहेत, त्यामुळे ती स्वस्त आहेत .
याउलट भारतातील फळे, भाजीपाला आहेत.
कृषी, दुग्धोत्पादन आणि मत्स्योद्योग यावरील आयात कर शून्य करा अशी ट्रम्प यांनी मागणी केली होती मात्र भारताने त्या स्पष्ट नकार दिल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा हर्ट झाला असून त्यामुळे त्यांनी भारताविरोधात कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे.
भारत अमेरिकेत रत्न,दागिने, चामड्याच्या वस्तू, ऑटोपार्ट, गारमेंट्स , बासमती तांदूळ, मासे, दूध निर्यात करतो. ट्रम्प टेरीफमुळे केवळ ३२ अब्ज डॉलर निर्यात थंडावली आहे. मात्र आपण भारतीय बचत करत असल्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे ही मोठी जमेची बाजू आहे.
मध्यमवर्गीय भारतीय ग्राहक हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे या देशाला हलवणे इतके सोपे नाही दबाव टाकणं हा ट्रम्प यांचा स्वभाव आहे.भारताला ते टारगेट करण्यासाठी पाकिस्तानला जवळ करीत आहेत. मात्र ट्रम्प यांच्या दबावाला आपण बळी पडता कामा नये.
अमेरिकेला भारताची दुप्पट गरज आहे.
प्रत्येकाने आपले युद्ध आपणच लढावे लागणार असून कोणतीही जागतिक संघटना मदतीस येणार नाही. अधिक टेरीफ लावले तरी भारत झुकत नाही हा ट्रम्प यांचा पराभव असून भारतीय अर्थव्यवस्था अजिबात धोक्यात आलेली नाही.
भारताचा जीडीपी ७टक्के असून जगात भारतीय तरुणांची मागणी वाढते भारताविषयी सकारात्मक असणे गरजेचे आहे. यावेळी पंढरपूर अर्बन बँकेच्या ११३वर्षांच्या यशस्वी वाटचालीसाठी हळदणकर यांनी आश्चर्य व्यक्त करून कौतुक केले.
सुरुवातील माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.
सौ माधुरी जोशी यांनी परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.पी. कुलकर्णी यांनी केले तर आभार हरीश ताठे यांनी मानले.



















