सांगोला – सांगोला महाविद्यालयात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ प्रा.डॉ.बबन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना देऊन या दिनाचे महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.एन.खंदारे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन कार्यालयीन अधीक्षक विलास माने यांचे मार्गदर्शनाखाली प्रा.अमोल ऐवळे, बाबासो इंगोले यांनी केले.




















