अकलूज – औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय (पदविका) येथे दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी, प्रथम वर्ष डी. फार्मसी विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्राम साजरा करण्यात आला. या इंडक्शन प्रोग्राम दरम्यान प्रथम वर्ष डी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेची व महाविद्यालयाची ओळख करून देण्यात आली.
दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य मा. नानासाहेब देवडकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व सर्व अध्यापकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक, खेळ व इतर महाविद्यालयात होणाऱ्या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा सांगून माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली ओळख व्यासपीठावर येऊन सर्वांना करून दिली.
महाविद्यालयात प्रवेश घेणारा विद्यार्थी हा महाविद्यालयीन वातावरणात नवीन असतो; त्याची व महाविद्यालयाची गट्टी जमावी हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात सर्व प्रथम वर्ष डी. फार्मसी चे विद्यार्थी-विद्यार्थिनी, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


















