सोलापूर : केगाव येथील एन बी नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलच्या सहकार्याने “डेमो डे / आयडिया शोकेस– लॅब इनोव्हेशन प्रोजेक्ट्स एक्झिबिशन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात द्वितीय वर्ष बी.टेक (E&TC) विद्यार्थ्यांनी आपापले नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स सादर केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एस. डी. नवले, उपप्राचार्य डॉ. आर. टी. व्यावहारे, विभागप्रमुख डॉ. एस. एस. शिर्गन, IIC चे संयोजक डॉ. एम. एच. नाईकवाडी, तसेच IIC अध्यक्ष प्रा. एस. टी. जगताप यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात द्वितीय वर्ष बी.टेक (E&TC) चे एकूण 61 विद्यार्थी 23 गटांमध्ये सहभागी झाले व त्यांनी आपापल्या नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट आयडियाजची प्रस्तुती केली.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प तंत्रज्ञानाच्या नव्या कल्पना आणि संशोधनाची झलक दाखवणारे होते. इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमेशन, आणि कम्युनिकेशन या क्षेत्रांतील विविध समस्यांवर उपाय शोधणारे मॉडेल्स विद्यार्थ्यांनी तयार केली.
डॉ. नवले यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की, “अभियांत्रिकी शिक्षणात प्रयोगशीलता आणि नवकल्पना हीच खरी ताकद आहे. अशा प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना मिळते.”
हा उपक्रम कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या नेतृत्वाखाली तर प्राचार्य डॉ. एस डी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ईएनटीसी विभागातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थीवर्गाने परिश्रम घेतले.

























