काशिगाव – दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील आरोग्य उपकेंद्र कडील अर्धवट राहिलेल्या रस्त्याची पाहणी आज दक्षिण सोलापूर चे तहसीलदार किरण जमदाडे यांनी केली आहे
संबंधित उपकेंद्राकडे जाणारा रस्ता हा बंद पडला असून यामुळे काशिगाव मधील रुग्णांना दवाखान्याकडे ये जा करताना हेळसांड होत आहे याबाबतीत कासेगाव चे सरपंच यशपाल वाडकर व त्यांच्या ग्रामपंचायत सदस्यांनी संबंधित रस्त्याची पाहणी करून त्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून संबंधित रस्ता हा उपकेंद्राकडे जाणाऱ्या रुग्णांना खुला करून मिळावा यासाठी गेल्या सप्ताहात निवेदन दिलं होतं या नियोजनाची तात्काळ दखल घेऊन तहसीलदार किरण जमदाडे यांनी ताबडतोब पाणी केली व संबंधित रस्ता आठवडाभरात खुला करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले
संबंधित रस्त्याच्या बाजूला गावठाण असून गावठाणावरती काही प्रमाणात अतिक्रमण झाले आहे व तसेच त्या बाजूला संबंधित काही शेतकऱ्याचे बागायत जमीन आहे त्यामुळे आरोग्य उपकेंद्राकडे जाणाऱ्या रस्ता हा पूर्णपणे बंद आहे या अगोदर तो रस्ता वाडकर गल्लीमधून अज्ञान बाई माळी यांच्या शेताच्या बाजूने आरोग्य उपकेंद्राकडे जात होता परंतु त्या रस्त्याच्या बाजूला एका घरमालकाने आपल्या घराचे बांधकाम सुरू केल्याने हा रस्ता चालू स्थितीमध्ये बंद झाला आहे त्यामुळे उपकेंद्राकडे जाणाऱ्या वाहनांना तसेच रुग्णांना मोठ्या प्रमाणात अर्थ निर्माण होत आहे म्हणून ग्रामस्थांनी या रस्त्याची मागणी खुला करून मिळावा म्हणून तहसीलदार यांच्याकडे केली होती यावेळी कासेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य संभाजी चौगुले माजी सरपंच नेताजी पाटील तंटामुक्त समितीचे तत्कालीन अध्यक्ष संजय पवार सामाजिक कार्यकर्ते सुधीर चौगुले ज्ञानेश्वर रोकडे ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव जालिंदर गायकवाड सत्यपाल वाडकर सौ अनिता हेडे शामराव ईटुकडे ताजुद्दीन शेख बबन कुंभार यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते

























