Thursday, March 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दादाची विजयी सभा होण्याऐवजी दुर्देवाने शोकसभा….!

Makrand Dhobalebyतरुण भारत
February 3, 2026
in marathwada
0
0
SHARES
214
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देगलूर : महाराष्ट्र उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्रातील चाहत्यांकडून दुखःद भावना व्यक्त केल्या जात आहेत. आज दि. ०३ फेब्रुवारी रोजी नगर परिषद देगलूर येथे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थी कलश दर्शन व शोकसभा आयोजित करण्यात आली.

या शोकसभेत जड अंतःकरणाने देगलूरकरांनी घेतला स्व. अजित पवारांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेतले. देगलूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची सत्तास्थापनेनिमित्त विजयी सभा होणार होती परंतु दुर्दैवाने आज दादांच्या स्मरणार्थ शोकसभा घ्यावी लागली.

महाराष्ट्राचा दादा माणूस आणि कामाचा माणूस म्हणून स्वर्गीय अजितदादा पवार यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला होती. २८ जानेवारी रोजी बारामतीला सभेसाठी जात असताना विमान अपघातात अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी काही क्षणात महाराष्ट्रात पसरली आणि सर्व दादांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली. ज्या ज्या कार्यकत्यांना स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अंत्यविधीचे दर्शन घेता आले नाही अशांना किमान अस्थी कलशाचे दर्शन व्हावे म्हणून महाराष्ट्र विविध ठिकाणी अस्थी कलश दर्शन व शोकसभा आयोजित करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर देगलूर नगरपरिषदेच्या प्रांगणात या शोकसभेचे आयोजन करण्यात आले.


यावेळी लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर, माजी आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार सुभाष साबणे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मीकांत पदमवार, डॉ. मीनल खतगावकर, देगलूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. विजयमाला बालाजी टेकाळे, मुख्याधिकारी निलम कांबळे, माजी उपनगराध्यक्ष बालाजीराव टेकाळे, उपनगराध्यक्ष अॅड अंकुश देसाई देगावकर, शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार, तालुकाध्यक्ष राहुल देसाई, नगरसेवक नंदकुमार शाखावार, नगरसेवक सुमंत कांबळे, डॉ. पुजा गायकवाड, विक्रम नागशेट्टीवार, पंकज देशमुख करडखेडकर, मारोती वाडेकर, अर्जुन गायकवाड, सय्यद अजिज, बालाजी मैलागिरे, नाना मोरे यांच्यासह नगरसेवक – नगरसेविका, विविध पक्षांचे कार्यकर्ते, नगरपरिषदेचे कर्मचारी आणि मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

विजय सभाऐवजी दुर्दैवाने शोकसभा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या नगरपरिषदेच्या प्रचारासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे देगलूर येथील मोंढा मैदानावर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासभेत पवार म्हणाले होते की, देगलूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आली तर विजयी सभेसाठी अजितदादा पवार येणार होते परंतु दुर्दैवाने आज दादांच्या स्मरणार्थ शोकसभा आयोजित करावी लागली.

लक्ष्मीकांत पदमवार यांना अश्रू अनावर झाले

देगलूर येथील शोकसभेत स्वर्गीय पवारांच्या आठवणीत भावना व्यक्त करीत असताना राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मीकांत पदमवार यांना अश्रू अनावर झाले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना लक्ष्मीकांत पदमवार यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. देगलूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत पदमवार श यांना स्वर्गीय अजितदादा पवारांनी पक्षबांधणी आणि प्रचार मोहिमेसाठी पुर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यांच्या पाठबळामुळे पदमवार आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिले.

निधी संदर्भात दादांनी दिलेला शब्द पाळला जाईल : आ. प्रताप पाटील

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी देगलूरच्या विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही, असे प्रचारसभेत सांगितले होते. दुर्दैवाने त्यांचा दुःखद निधन झाला. स्वर्गीय पवारांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना जोडून ठेवेल तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन निधी संदर्भात स्वर्गीय अजितदादांचा शब्द वाया जाऊ देणार नाही असे, आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

गोदावरी नदीत अस्थी कलशाचे विसर्जन

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थी कलशाचे दर्शन नायगाव, नरसी, खानापूर फाटा, देगलूर, मुखेड आदीं ठिकाणी अस्थी कलशाचे दर्शन झाल्यानंतर संध्याकाळी नांदेड येथील गोदावरी नदीत अस्थी कलशाचे विसर्जन करण्यात येणार असल्याची सांगण्यात आले. एकूणच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्याने एक कामाचा चांगला माणूस मुकला आहे, अशा भावना जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.

Post Views: 344
Previous Post

तोल जाऊन पडल्याने धबधब्यात बुडून युवकाचा दूर्दैवी मृत्यू

Next Post

नगरपालिका ॲक्शन मोडवर… थकीत गाळ्यांना ठोकले सील

Makrand Dhobale

तरुण भारत

Next Post

नगरपालिका ॲक्शन मोडवर… थकीत गाळ्यांना ठोकले सील

ताज्या बातम्या

श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण यज्ञ भक्तीभावात

श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण यज्ञ भक्तीभावात

March 26, 2026
शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

शहरातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

March 26, 2026
डिजिटल अरेस्ट गुन्हयातील एकास अटक

डिजिटल अरेस्ट गुन्हयातील एकास अटक

March 26, 2026
बचत गटांत बदलाची चाहूल! २५ हजार पदाधिकाऱ्यांवर फेरबदलाची शक्यता

बचत गटांत बदलाची चाहूल! २५ हजार पदाधिकाऱ्यांवर फेरबदलाची शक्यता

March 26, 2026
प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच अवैध गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीवर कारवाई होणार

प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच अवैध गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीवर कारवाई होणार

March 26, 2026

सोलापूरहून अयोध्येला थेट जाण्यासाठी पंढरपूर किंवा सोलापूर येथून रेल्वे सुरू करण्याची मागणी

March 26, 2026
उमरडच्या नेहा चौधरीची धर्मदाय निरीक्षक पदी निवड

उमरडच्या नेहा चौधरीची धर्मदाय निरीक्षक पदी निवड

March 26, 2026
वीजपुरवठा पुरेशा दाबाने व सुरळीत करावा, शिवणे ग्रामस्थांची मागणी

वीजपुरवठा पुरेशा दाबाने व सुरळीत करावा, शिवणे ग्रामस्थांची मागणी

March 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0767242

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697