जालना – सद्या सर्वत्र सण आणि उत्सावाचे दिवस सुरु असुन, या कालावधीत स्वयंपकाच्या गॅस सिलेंडरची मागणी वाढत असते. परंतू स्वयंपाकाचे गॅस एजन्सीमार्फत गॅस सिलेंडर डिलीव्हरी करणारे कर्मचारी ग्राहकांकडुन अतिरिक्त रुपयाची मागणी करत असल्याचेनिदर्शनात आले असल्याचे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी बैठकीत सांगितले आहे.
त्यानुसार गॅस डिलीव्हरी करणारे गॅस एजन्सीचे कर्मचारी किंवा खाजगी व्यक्ती नोकरदार हे ग्राहकांकडून अतिरिक्त रुपयाची मागणी करीत असल्यास संबंधितांवर गॅस एजन्सीमार्फत कारवाई करण्यात यावी. तसेच गॅसधारक लाभार्थी यांनी कुणालाही अतिरिक्त पैसे देवू नये. तसेच गॅस सिलेंडर डिलीव्हरी काम करणाऱ्यांनी देख्रील ग्राहकांकडून अतिरिक्त पैशाची मागणी करु नये.
अन्यथा अशी बाब निदर्शनास आल्यास संबंधित गॅस एजन्सीमार्फत कारवाई करण्यात येईल अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिल्या आहेत.