बार्शी – काँग्रेस पक्षाची संघटना बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने हे अभियान राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमास AICC चे निरीक्षक देबासिस पटनायक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा निरीक्षक प्रा. यशराज पारखी, ॲड. भाऊसाहेब आजबे तसेच सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सात्विक शटगार यांनी बार्शी शहराध्यक्ष विजय साळुंके यांनी मागील नगरपालिका निवडणुकीत उत्तम प्रकारे काम करीत बुथ स्तरापासून कार्यकर्ते जोडणे, काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न केले आहेत. आगामी काळात सर्व काँग्रेस पदाधिकारी यांनी एकजुटीने काम करुन सर्वसामान्य तरुण, शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी वर्गातील जनतेसाठी काम करावे तसेच आगामी निवडणुकासाठी सज्ज राहून काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सर्व पदाधिकारी हे उत्तम प्रकारे काम करत असल्याने वरिष्ठापर्यंत आपल्या कामाची दखल घेतली जाईल, असे सांगण्यात आले.
यावेळी बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विजय साळुंके, तालुकाध्यक्ष सतीश पाचकुडवे, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष जुगल किशोर तिवाडी, युवक विधानसभा अध्यक्ष निखील मस्के, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, युवक काँग्रेस शहराध्यक्ष संतोष शेट्टी, ओबीसी तालुकाध्यक्ष रमेश खांडेकर, महिला तालुकाध्यक्ष रंजना साळुंके, शहराध्यक्ष सोनाली जगझाप, बप्पा सुतार, ऍड योजना घोलप, रचना साळुंके, विनोद साळुंके यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























