सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे प्रथमच दि.२३ व २४ डिसेंबर रोजी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ब्रेक थ्रू टेक्नॉलॉजीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषद मध्ये शाश्वततेच्या आव्हानांना तोंड देणेसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पना यांची महत्वाची भुमिका स्पष्ट करण्यात येणार आहे. या मध्ये जगभरातील तज्ञ संशोधक सहभागी होणार आहेत.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी हि आंतरराष्ट्रीय परिषद उपयुक्त ठरणार आहे.
हि परिषद फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा नीलवर्णा रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ.अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा.प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ.रविंद्र शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
या परिषदेला बोर्ड ऑफ रिसर्च इन न्यूक्लिअर सायन्स (बीआरएनएस) कडून २ लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उपप्राचार्या डॉ.विद्याराणी क्षीरसागर यांनी दिली.


















