सोलापूर – जिल्ह्यातील अक्कलकोट, मैदर्गी, दुधनी,मोहोळ,मंगळवेढा, सांगोला, अकलूज, पंढरपूर, करमाळा, कुर्डूवाडी, बार्शी या नगरपरिषद निवडणुकीसाठी जिल्ह्याचे प्रभारी, माजी आमदार व प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे मुलाखती घेण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, प्रदेश सचिव सुरेश हावळे, शाहिनताई शेख, रविकिरण कोळेकर, जावेद काझी, राजेंद्र शेरखाने, अँड अर्जुनराव पाटील, राजकुमार पवार, विजयकुमार हत्तुरे, अशपाक बळोरगी, मोतीराम चव्हाण, सिद्राम पवार, अरुण जाधव, अशोक देवकते उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले की , मतदार काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहेत.म्हणून कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराशी संपर्क साधावा. महागाई, बेरोजगारी, महिला वरील अत्याचार या सर्व गोष्टी गोष्टींना लोक वैतागले आहेत. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिल्यास पुन्हा पूर्वीचे दिवस चांगले दिवस येतील. सर्वांनी खंबीरपणे काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे , असे आवहान शटगार यांनी केले.
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या नियोजनावर संघटनात्मक रणनीतीवर तसेच स्थानिक विकासावर सविस्तर चर्चा करून संघटना मजबूत करून निवडणुकीत उतरावे, असे आवाहन पक्षाचे प्रभारी मोहन जोशी यांनी केले.
यावेळी मोहोळ नगरपरिषद ३५, अक्कलकोट नगरपरिषद २५, मैदर्गी नगरपरिषद १०, दुधनी नगरपरिषद २६,मंगळवेढा नगरपरिषद २३,सांगोला नगरपरिषद २६,अकलूज नगर परिषद २६, पंढरपूर नगरपरिषद ४०,करमाळा नगर परिषद २२, कुर्डूवाडी नगरपरिषद २५, बार्शी नगरपरिषद ३९ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.
यावेळी तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, किशोर पवार ,मल्लिकार्जुन पाटील, प्रशांत साळे, राहुल घुले, गिरीश शेटे, प्रतापराव जगताप, भीमाशंकर जमादार , अजयसिंह इंगोले, संजय पाटील ,आदित्य फत्तेपूरकर, विजय साळुंखे, तोहिद मुल्ला, फिरोज खान, वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश पवार, अर्जुनराव पाटील, राजकुमार पवार, मोतीराम चव्हाण, सिद्राम पवार, अमोल म्हमाने, गजेंद्र खरात, रमेश हसापुरे, दत्तात्रय सावंत, अमजद शेख, संतोष शिंदे, सुनीता आवगडे, नाथा ऐवळे, बाळासाहेब मगर, अशोक देवकते, हणमंत मोरे, धर्मराज पुजारी, सिद्राम सलवदे, सुदर्शन आवताडे, सिकंदरताज पाटील,जाहिर मनेर,बाळासाहेब दळवी, जहांगीर शेख, राहुल पाटील, सुहास भाळवणकर, समीर कोळी, अमर सूर्यवंशी,संदिप शिंदे, बाळासाहेब आसबे ,भाग्यवंत नायकुडे, सोमनाथ आरे, शिवाजी धोत्रे,अँड रणजित पाटील,हमिद शिकलगार आदी उपस्थित होते.


















