अक्कलकोट – अक्कलकोट नगर पालिकेच्या निवडणुकीकरिता इच्छुक कार्यकर्त्या र्नी भाजपा कार्यालय येथे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सह भाजपा पदाधिकारी व निरिक्षक यांच्या उपस्थितीत मॅरॉथॉन मुलाखाती दिल्या . यावेळी इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली आहे.
२५ नगरसेवक पदासाठी व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या मुलाखाती घेण्यात आल्या . अंत्यत कमी वेळात सर्व इच्छुकांची मुलाखात घेण्यात आल्या . इच्छुकांची संख्या पाहता नाराजांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही .
प्रभाग क्र १ पासुन ते प्रभाग क्र १२ पर्यंत इच्छुकांच्या मुलाखाती घेण्यात आल्या . या वेळी प्रभाग क्र १ ते १२ पर्यंत प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या प्रचंड होती .
















