सोलापूर – जन्ममृत्यू ऑफिस मधील भ्रष्टाचार अधिकारी ऑपरेटर व एजंटावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. जे कोणी दोषी आढळतील अशांना योग्य ते कायदेशीर कारवाई करावी व अशा भ्रष्ट कर्मचाऱ्याकडून सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांची होणारी पिळवनूक थांबवून त्यांच्या अडचणी लवकरात लवकर दूर कराव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
जन्म मृत्यू नोंदणी विभागाकडून जन्म मृत्यू चे भरपूर प्रकरण मागील काही महिन्यापासून प्रलंबित आहेत. घरी मयत झालेले मृत्यू दाखले, बाळाचे नाव दाखल करणे, दुरुस्ती करिता करण्यात आलेल्या अर्ज गेल्या काही महिन्यापासून आज तागायत निकाली निघाले नाहीत. आज तारखेला जन्म मृत्यू चे एकूण अर्जाची संख्या दहा ते बारा हजार पेक्षा अधिक प्रलंबित अर्ज आहेत. त्यामध्ये बाळाचे नाव दाखल करणे अर्ज एक हजार पेक्षा अधिक प्रलंबित आहे. व घरी मयत झालेले मृत्यू दाखला मिळण्यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे घालावे लागत आहेत.
जन्ममृत्यू ऑफिस मधील संबंधित ऑपरेटर नागरिकांना कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत व्यवस्थित माहिती न देता उडवा उडवीची उत्तरे देऊन लवकरात लवकर जन्म मृत्यू दाखला पाहिजे असेल तर पैसेची मागणी एजंटामार्फत करतात. तसेच सोलापूर एजंटामार्फत व राजकीय पुढारी यांचे अर्ज तात्काळ निकाली निघतात व एजंट संबंधित ऑपरेटर यांना ठरलेली रक्कम देऊन त्यांची कामे करून घेतात. त्यामुळे सामान्य नागरिकांचे अर्ज दोन ते तीन महिन्यापासून प्रलंबित ठेवले जातात.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनलदास, शहराध्यक्ष मनीषा कोळी, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर, शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे, श्रेयश माने, महिला कार्याध्यक्ष जयश्री जाधव, सुनंदा सूर्यवंशी, सुनिता कारंडे, सिद्धांम्मा तपले, जानका पाटील, रुक्मिणी चिल्लाळ, शिवलीला दुबलगुंडे, अंबा चलगेरी, अंबू मुंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

























