भातोडी येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण.
तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी / प्रतिनिधी
वृक्ष लागवड करून न थांबता लावलेल्या प्रत्येक झाडाचे प्रत्येकाने संगोपन केले पाहिजेत. असे प्रतिपादन जाफराबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण खिल्लारे यांनी सोमवारी ता.1 भातोडी येथे केले.
भातोडी जिल्हा परिषद शाळेत कृषी दिनानिमित्तआयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी गटशिक्षणाधिकारी सतिश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ,विस्तार अधिकारी रामकुमार खराडे, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन विनोद कळंबे, केंद्रप्रमुख सुधाकर चिंधोटे, गणेश लोखंडे, सरपंच भारती गोफणे,उपसरपंच अरुण भोरे, शाळा समिती अध्यक्ष भगवान उगले, मधुकर गोफणे , तलाठी डाके, ग्रामसेवक सुनिल सोनवणे,भगवान चव्हाण , श्री नवले, दिलीप चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सपोनि श्री खामगळ यांनी ही मनोगत व्यक्त केले.
यावेळी भगवान उगले यांनी शाळेला भेट दिलेल्या 100 नारळाच्या झाडांचे रोपन शाळा परिसरात, शिवाजी महाराज स्मारक परिसरात करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर गोफणे यांनी केले.सरपंच भारती गोफणे यांनी सर्व झाडांची निगा राखण्यासाठी ग्रामपंचायत कायम सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मुख्याध्यापक धनंजय मुळे यांनी केले.कार्यक्रमासाठी गजानन मुंढे, हर्षा लांडगे,अशोक भोरे,संतोष लोखंडे,गजानन भोरे, समाधान चव्हाण, दत्तात्रय उगले, लिंबाजी गोफणे, संतोष मघाडे, शुभम भोरे, परमेश्वर उगले, दत्तू उगले, सांडू उगले, दत्तू गायके,दत्तू चव्हाण, संतोष उगले, योगेश भोरे, कारभारी चव्हाण,ज्योती भोरें , आशा उगले,पार्वती उगले,आनंदीबाई गायकवाड, भागवत उगले,लक्ष्मण ढगे,साहेबराव गावंडे, सुभाष भोरे, यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.