मंगळवेढा – सिध्दापूर फेस्टिव्हल 2026 च्या वतीने मंगळवेढ्याचे जेष्ठ पत्रकार शिवाजी पुजारी यांना पत्रकार क्षेत्रातील जनमित्र पुरस्कार घोषीत झाला असून त्याचे वितरण दि.13 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
मंगऴवेढा येथिल पत्रकार शिवाजी पुजारी हे गेली तीस वर्षे वृत्तपत्रीय क्षेत्रात काम करत आहेत. समाजातील पिडीतांना वेळोवेळी न्याय देण्याचेही काम त्यांनी केले आहे. यापुर्वीही त्यांना चांगल्या कामकाजा बद्दल अनेक पुरस्कार बहाल करण्यात आले आहेत.
सिध्दापूर येथील फेस्टिव्हल २०२६ च्यावतीने दि.१३ रोजी सायंकाळी ६:०० वाजता विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
















