सोलापूर : महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार पाटकर यांची मुलगी कु. जिजा ज्योतिर्लिंग पाटकर (इयत्ता नववी इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल) हिला शाळेकडून सन 2025 – 26 करिता सर्वोत्कृष्ट विद्यार्थी (बेस्ट स्टुडन्ट फॉर द इयर 2025 – 26) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कु.जिजा ज्योतिर्लिंग पाटकर ही अभ्यास ,खेळ, विविध स्पर्धात्मक परीक्षा यामध्ये अग्रेसर असल्यामुळे शाळेकडून तिला सन्मानित करण्यात आले. तिच्या आई वीणा पवार पाटकर या सध्या अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका म्हणून कार्यरत आहेत तसेच वडील ज्योतिर्लिंग पाटकर हे उप अभियंता म्हणून जलसंपदा विभागामध्ये कार्यरत आहेत. इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बेस्ट स्टुडन्ट फॉर द इयर 2025- 26 हा अवॉर्ड घोषित केला गेला. या निमित्ताने अतिरिक्त आयुक्त वीणा पवार या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
आपला मुलगा किंवा मुलगी मोठ्या यशाच्या शिखरावर जावे असे वाटत असते. त्यासाठी पालक सातत्याने तळमळीने प्रयत्न करत असतात. मुलांनी सुद्धा आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केली पाहिजे, असे मार्गदर्शन महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले. दरम्यान, इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक अमोल जोशी , सायली जोशी , मानसी जोशी,मुख्याध्यापिका व श्रीमती वळसे टीचर, श्रीमती जोशी टीचर, प्रीती स्वामी, हॉकी प्रशिक्षक अजय चाबुकस्वार तसेच सर्व शिक्षक यांनी तिच्या कौतुक केले आहे.

















