Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्विज्ञानातील तत्वांचे पालन करावे – मल्लिनाथ कल्याणशेट्टी

तरुण भारतbyतरुण भारत
January 28, 2026
in marathwada
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट –  आयुर्विज्ञान रोगोपचाराचे शास्त्र नसून निरोगी, संतुलित आणि दीर्घ आयुष्य कसे जगावे हे सांगणारे शास्त्र आहे. चरक, सुश्रुत, वाग्भट यांसारख्या महान ऋषींनी सुद्धा आपल्या ग्रंथांमध्ये आयुर्विज्ञानास प्रमाण मानले आहे, म्हणून नागरिकांनी   निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदातील तत्वांचे पालन केले पाहिजे, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण  संस्था संचलित पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक मराठी व सेमी इंग्लिश विभागाच्यावतीने आयुर्विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या संचालिका शांभवीताई कल्याणशेट्टी, संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, जुनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी, सेमी इंग्लिश विभाग प्रमुख रूपाली शहा, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शरीरात वात, पित्त आणि कफ हे आजार उद्भवतात, त्या अनुषंगाने  प्रत्येक व्यक्तीचा  आहार, विहार व उपचार बदलतो. त्यामुळे

 “जसा आहार तसा विचार आणि तसा आचार” असे आयुर्विज्ञान सांगते  औषधोपचारांसोबत पंचकर्म, योग, ध्यान, प्राणायाम आणि नैसर्गिक जीवनशैली यांना महत्त्व दिले पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिगंबर जगताप यांनी केले, सूत्रसंचलन निशिगंधा सोमेश्वर यांनी केले आभार कल्पना स्वामी यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुर्यकांत रूगे , मनिषा सुरवसे, रविकिरण दंतकाळे, दिगंबर जगताप, प्रा सलोनी शहा, शितल टिंगरे, प्रतिभा माने, यांनी प्रयत्न केले.

  

प्रदर्शनातील कलाकृतीचे नागरिकाकडून कौतुक

दोन दिवसाच्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पारंपारिक सेंद्रिय शेती आणि आधुनिक शेती यातील बदल, शिवकालीन खेडे, इस्त्रोचे माहिती पट, आयुर्वेदाचे महत्त्व, योगिक दिनचर्या,घनकचरा व्यवस्थापन, स्वदेशी सौंदर्यप्रसाधने, पशुपक्षांची घरटे, प्राणी व वनस्पतींचे प्रकार आदी कलाकृती उत्तम रित्या साकारल्या होत्या. प्रदर्शनातील कलाकृती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती, त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले प्रदर्शनातील विशेष आकर्षण

छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ल्यांना  युनेस्कोने जागतिक ऐतिहासिक वारसा यादीत निवड केली म्हणून विद्यार्थ्यांनी संकुलाच्या प्रांगणात 12 गड व किल्ल्यांची प्रतिकृती साकारली होती. 

पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील आयुर्विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ करताना मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर

Post Views: 36
Previous Post

५ दिवसांच्या कार्यआठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचा ऑल इंडिया बँक संप

Next Post

सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्काराने जिजा पाटकर हिचा गौरव 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्काराने जिजा पाटकर हिचा गौरव 

ताज्या बातम्या

वळसंग येथे श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रेचा उत्साहात समारोप; माळी समाजाकडून पारंपरिक ‘आमटी’ महाप्रसादाचे आयोजन

July 1, 2026
कृषी दिनडॉक्टर्स डे व चार्टर्ड अकाउंटंट्स डे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरे

कृषी दिनडॉक्टर्स डे व चार्टर्ड अकाउंटंट्स डे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरे

July 1, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये इ.११ वी नवगतांचे उत्साहात स्वागत

सांगोला विद्यामंदिरमध्ये इ.११ वी नवगतांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026
“मुलींनो, मनात भीती किंवा संकोच न बाळगता ‘निर्भया’ बनून निर्भीडपणे जगा!”

“मुलींनो, मनात भीती किंवा संकोच न बाळगता ‘निर्भया’ बनून निर्भीडपणे जगा!”

July 1, 2026
वसुंधरा महाविद्यालयातील डॉ. अशोक पाटील सेवानिवृत्त

वसुंधरा महाविद्यालयातील डॉ. अशोक पाटील सेवानिवृत्त

July 1, 2026

पिलीव परीसरात जिओच्या नेटवर्कचा बट्ट्याबोळ ग्राहकांमध्ये प्रचंड संताप, तक्रारीची कोणीही दखल घेईनाच?

July 1, 2026

महापालिका महिला व बालकल्याण समितीसह  ७ समिती सभापती पदासाठी ३ जुलै रोजी निवडणूक

July 1, 2026
महिला संघटित झाल्या तर परिवर्तनाची नवी क्रांती घडते – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

महिला संघटित झाल्या तर परिवर्तनाची नवी क्रांती घडते – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0951814

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697