सोलापूर – जिजामाता प्रशाला कोंडी ता उत्तर सोलापूर च्या इ10 वी चा निरोप समारंभात राष्ट्रमाता जिजामाता व संस्थेच्या माजी अध्यक्ष स्वर्गीय निर्मलाताई ठोकळ यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ यांनी केले व आशीर्वाद पर शुभेच्छा दिल्या.
तसेच संस्थेच्या सचिवा सौ शिल्पाताई ठोकळ संचालक मंडळ प्रशालेचे मुख्याध्यापक श्री उदय जाधव यांनी दहावी विद्यार्थ्यांना खूप खूप यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
इ 10 वी वर्गशिक्षक श्री सारंग पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण करून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमात कुमारी स्वाती शिंदे कुमारी श्रावणी नीळ कुमारी समृद्धी भोसले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं त्यानंतर अध्यक्षीय भाषण माननीय श्री सचिन भाऊ ठोकळ यांनी केलं या कार्यक्रमास सर्व शिक्षक श्री सारंग पाटील श्री लक्ष्मण आगलावे श्री कैलास देशमुख श्रीमती सुनिता वणगे शिपाई संतोष कासे आदी शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु स्नेहल जगन्नाथ शिंदे तर आभार कु आम्रपाली दगडू कांबळे हिने केले
























