मोडनिंब – ता. माढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ ची शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.१४ पालक सदस्य असलेल्या या समितीत अध्यक्षपदी हनुमंत महादेव यादव यांची तर उपाध्यक्षपदी स्वाती बालाजी गायकवाड यांची निवड करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी म्हणून कैलास कमलाकर तोडकरी,शिक्षणप्रेमी राजेश सुरेश निंबाळकर,शिक्षक प्रतिनिधी श्रीमती नाझनीन अब्दुल सत्तार काझी,तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कृष्णमित हेमंत गडेकर व श्रेयस विश्वास सुर्वे यांची निवड करण्यात आली.सदस्य म्हणून सुहाना मकसूद तांबोळी,तेजल सुमित ओहळ,तानाजी ज्ञानदेव बिनगे,शौकत बाबासाहेब पठाण,शितल संतोष सुर्वे,राधिका अनिल मंडले,पत्रकार विजयकुमार भालचंद्र परबत ,काजल सुमित क्षीरसागर,अजय बंडोपंत माळी,कृष्णात वसंत ओहोळ,राहुल पांडुरंग ओहोळ,सविता सोमनाथ नागटिळक यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापक राजन सावंत यांनी प्रास्ताविकातून शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका,सदस्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांची सविस्तर माहिती दिली. शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी तसेच भौतिक सुविधा व विकासकामांसाठी पालकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार संजय नाळे यांनी मानले.सर्व निवडी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. या निवड प्रक्रियेस शाळेतील सर्व शिक्षक, सहकारी कर्मचारी व उपस्थित मान्यवरांनी सहकार्य केले.























