तभा फ्लॅश न्यूज/ नांदेड : आ हेमंत पाटील यांनी जातीवादी द्वेषभावनेतून दलित अर्बन नक्षलवादी असे विधानभवनात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन सिडको येतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सिडको हडको परिसरातील आंबेडकरीवादी युवकांनी आंदोलन करून हेमंत पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात सम्राट आढाव प्रसेंजित वाघमारे आनंद सूर्यवंशी केशव कांबळे चांदु गजभारे आनंद कोकरे प्रदीप हानवते संजय निळेकर बाळा पवळे बंटी गजभारे राहुल तारू आकाश सोनकांबळे अजय जोगदंड विशाल गायकवाड रोहन वाघमारे यासह अनेक आंबेडकरवादी विचारांचे युवक सहभागी होते.
नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांना एक निवेदन देण्यात आले. आंदोलनास हिंसक वळण लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.