पंढरपूर – पत्रकारिता दिन साजरा करताना मला सांगावस वाटते की पत्रकारिता हा व्यवसाय नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे.आपण जे युनिव्हर्सला मागू ते मिळते हा एक आकर्षणाचा नियम आहे तसे आपल्या कार्यात यश मिळण्यासाठी आपण सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी केले.
पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने येथे पत्रकार दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पत्रकार भवन येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार नंदकुमार देशपांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.
या वेळी बोलताना प्रशांत डगळे यांनी, आपल्या प्रशिक्षण काळात अमरावती येथील जादूटोणा आणि आदिवासी जीवन, जलद पसरणाऱ्या अफवा याबाबत आलेले अनुभव कथन केले.
मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी, पत्रकारांना घरकुल योजने बाबत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी नूतन अध्यक्ष शंकर कदम, अभिराज उबाळे, अपराजित सर्वगोड, सतीश बागल, दत्तात्रय देशमुख, रफिक आतार लखन साळुंखे, सोहन जैस्वाल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रमुख मान्यवरांचे स्वागत अमोल कुलकर्णी यांनी केले तर प्रास्तविक प्रवीण नागणे यांनी केले. आभार सतीश बागल यांनी मानले.


















