वळसंग : दक्षिण सोलापूर हत्तरसंग कुडल येथील पत्रकार श्री. गुरु गायकवाड यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले असता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांची पंढरपूर येथील संपर्क कार्यालयात भेट घेतली.ह्या वेळी नागेश फाटे यांच्या कडून शाल व श्री विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती देऊन त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी गायकवाड यांच्या पत्रकारितेतील सत्यनिष्ठेचे आणि निडर भूमिकाचे विशेष कौतुक केले.सत्कार स्वीकारल्यानंतर गुरु गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक झाल्याचे सांगितले आणि नागेश फाटे यांनी दाखवलेल्या आतिथ्याबद्दल आभार मानले.




















