अक्कलकोट – पत्रकार हे समाजाचा आरसा असून समाजामध्ये घडत असलेल्या चांगल्या कार्याचा दखल घेऊन वृत्त पत्राच्या माध्यमातून प्रसिद्धी देत असतात यामुळे चांगल्या आणि प्रामाणिक कार्य करण्याऱ्याला हत्तीचा बळ मिळत असल्याचा प्रतिपादन कापसे फाऊंडेशनच्या अध्यक्ष राजशेखर कापसे यांनी केले.
बुधवारी १४ रोजी अक्कलकोट मैंदर्गी रस्त्यावरील एम आय डी सी येथील हॉटेल वृंदावन येथे राजशेखर कापसे फाऊंडेशनच्या माध्यमातून संक्रात आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधून अक्कलकोट तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचा यथोचित गौरव करून सत्कार करण्यात आला.यावेळी पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रतिमेला पुष्प हर अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजशेखर कापसे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ समाधी मठाचे केदार गुरुजी, सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान पूज्य शेख नुरुदीन बाबा दर्ग्याचे सज्यादे अहमदपाशा पिराजादे, कार्यक्रमाचे समन्वयक सूर्यकांत कडबगांवकर सर, शरणू कापसे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी स्वामी समर्थ समाधी मठाचे केदार गुरुजी, सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान पूज्य शेख नुरुदीन बाबा दर्ग्याचे सज्यादे अहमदपाशा पिराजादे,पत्रकार शिवलाल राठोड, राजशेखर चौधरी, मारुती बावडे, शिवानंद गोगाव यांनी आपल्या मनोगतात शुभेच्छा दिल्या व राजशेखर कापसे हे गेली अनेक वर्षे लायन्स क्लब व अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चांगले कार्य करत असल्याचे नमूद केले. अहमदपाशा पिरजादे यांनी शेख नुरुदीन बाबा दर्ग्याच्या वतीने कापसे यांचा सन्मान केला.
या वेळी जेष्ठ पत्रकार बसवराज बिराजदार, प्रशांत भगरे, मारुती बावडे, शिवानंद फुलारी, अरविंद पाटील, शिवलाल राठोड, विरूपाक्ष कुंभार, राजशेखर चौधरी, नंदकुमार जगदाळे, सैदप्पा इंगळे, रमेश भंडारी, स्वामीराव गायकवाड, सोमशेखर जमशेट्टि, शिवानंद गोगाव, राजू जगताप,यशवंत पाटील, विश्वनाथ चव्हाण, महादेव जंबगी, गणेश भालेराव, अभिजीत पत्की , औदुंबर चव्हाण, अशपाक मुल्ला, कमलाकर सोनकांबळे, आदित्य अंबुरे यांचा सन्मान करण्यात आला. शिवा याळवर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले व आभार प्रदर्शन केले.
















