पिलीव – महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत 29 पैकी जवळपास 24 महानगरपालिकेत भाजपा _ शिंदे सेनेने सत्ता संपादन केली .यामध्ये भाजपने दैदीप्यमान यश संपादन केले.याबद्दल पिलीव येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने फटाके फोडून तसेच पेढे वाटुन जल्लोष करण्यात आला.
यावेळेस माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन मोहीते, सोलापूर जिल्ह्य अध्यक्ष राहुल मदने, पिलीवचे शहराध्यक्ष प्रमोद भैस, महालक्ष्मी पॅनेलचे सचिव अतुल नष्टे, प्रसिद्धीप्रमुख गणेश देशमुख, अँड सत्यजित गलांडे, अंकुश भैस, डॉक्टर निलेश कांबळे, गणेश पाटील, अरुणसिंग जामदार, महादेव जरग, सिताराम बोडरे, माळशिरस मंडल चिटणीस संजय पाटील, माजी तालुका उपाध्यक्ष तुषार लवटे, सोमा बोडरे, प्रविण वाघमारे, अमोल भैस, समर्थ जामदार, सनी घोंगडे, मयुर भैस, संकेत देशमुख, जयसिंग जनवर, संतोष झेंडे, प्रविण माने, निसार मुलाणी, योगेश देशमुख, संतोष करडे, राजु बोडरे, निलेश पिसे, सुरज वाघमारे, राहुल भैस, संतोष देशमुख, भागवत दणाने, दादा सातपुते, रुषीकेश बुगड, अमित भैस, मुन्ना पठाण, तुषार पवार, महेश गाढवे, आसिफ पठाण यांच्यासह पिलीव, झिंजेवस्ती, कुसमोड, बचेरी, सुळेवाडी ,परिसरातील भाजपचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते.
महानगरपालिकेत भाजपने मिळविलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल पिलीव यथे जल्लोष करताना .
















