अकलूज – भारत- न्यूझिलंड क्रिकेट सामन्याच्या फायनल मॅच चे प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर उदय सिंह क्रीडा मंडळाच्या वतीने उपनगराध्यक्ष शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी आयोजन केले होते हे प्रक्षेपण पाहण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील कुटुंबातील महिला सदस्य उपस्थितीत होत्या मोठ्या पडद्यावरील क्रिकेटचे प्रत्यक्ष प्रक्षेपण येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलावर मोफत दाखवण्यात आले.
या प्रक्षेपणाचा लाभ हजारो क्रिकेट प्रेमींनी घेतला न्यूझीलंडची एक एक विकेट पडत असताना जल्लोष आणि फटाकेचे आतिषबाजी होत होती शेवटी सामना जिंकला तेव्हा ढोल ताशा फटाक्याच्या आतिश बाजित गुलालाची उधळण करीत पुन्हा एकदा रंगपंचमीचा रंग साजरा केला ठीक ठिकाणी मिठाई वाटण्यात आली चौका चौकात फटाके फोडण्यात आले.
तरुणांच्या आनंदाला उधान आले नाच गाण्यात दंग होऊन युवक नाचतच राहिले हे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी परिसरातील हजारो क्रिकेट प्रेमी जमले होते




















