तभा फ्लॅश न्यूज : देशात युपीआय ( युनिफाइफ पेमेंट इंटरफेस ) सेवा लागू झाल्यापासून तात्काळ डिजिटल पेमेंटची सोपी व लोकप्रिय सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःजवळ रोख रक्कम बाळगणे मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. मागील महिन्यात २४ लाख कोटी रुपयांचे १,८४० कोटी युपीआय व्यवहार झाले.
युपीआय सेवा वापरण्यास सोपी असल्याने लोकप्रिय ठरली. केंद्र सरकारने २०१९ साली सर्व युपीआय व्यवहारातील शुल्क रद्द केले होते त्यामुळे ही सेवा स्वस्तही झाली पण आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी म्हंटले आहे की युपीआय व्यवहारावर काहीना काही खर्च आहे तो वापरकर्त्यांनी सामूहिकरित्या भरला पाहिजे याचाच अर्थ नजिकच्या काळात युपीआय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लागू शकते. असे झाले तर नागरिक युपीआयद्वारे व्यवहार करणार नाहीत कारण कोणीही स्वतःच्या खिशाला कात्री लावून व्यवहार करणार नाही
परिणामी पुन्हा रोखीचे व्यवहार वाढतील. रोखीने व्यवहार कमी करणे हा जो सेवेचा मुख्य उद्देश आहे त्यालाच यामुळे हरताळ फासला जाईल . त्यामुळे केंद्रसरकाने यूपीआय व्यवहारांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क लावू नये.